Rituraj Singh Died । ‘अनुपमा’ अभिनेता ऋतुराज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Rituraj Singh Died ।‘अनुपमा’ फेम अभिनेता म्हणून ओळख असलेल्या ऋतुराज सिंग यांचे आज मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 90 च्या दशकात झी टीव्हीवरील ‘तोल मोल के बोल’ हा रिॲलिटी गेम शो होस्ट केला होता. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे ऋतुराज सिंह यांनी टीव्हीवरील अनेक मालिका, अनेक चित्रपट आणि ओटीटी शोमध्ये काम केले होते.
झी टीव्हीवर 1993 मध्ये प्रसारित झालेला त्यांचा टीव्ही शो ‘बनेगी अपनी बात’ही खूप लोकप्रिय झाला. ‘हिटलर दीदी’, ‘ज्योती’, ‘शपथ’, ‘अदालत’, ‘आहट’, ‘दीया और बाती’, वॉरियर हाय’, ‘लाडो 2’ यांसारख्या मालिकांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. ते शेवटचे ‘अनुपमा’ मध्ये रुपाली गांगुलीसोबत दिसले होते, ज्यामध्ये एका रेस्टॉरंटच्या मालकाची भूमिका साकारली होती.
वृत्तानुसार, ऋतुराज गेल्या कित्येक दिवसापासून स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल मध्यरात्री म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर लोकांनी आणि जवळच्या लोकांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. अभिनेत्याचे चांगले मित्र अमित बहल यांनी या वृत्ताला दुजोरा देत दु:ख व्यक्त केले आहे.
हेही वाचा
Sharad Pawar । शरद पवारांची सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर पहिली प्रतिक्रिया ‘लोकशाहीचा हा मोठा विजय’
“अन्यथा माघार अन् सुट्टी दोन्ही…. ” ; आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज जरांगेंचा थेट इशारा





