मुंबई : गेल्या 24 तासात महाराष्ट्र राज्यात 3 हजार 580 नवे कोरोनाबाधित आढळले. तर 89 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. याशिवाय, 3 हजार 171 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 19 लाख 9 हजार 981 झाली आहे. तर, सध्या राज्यात 54 हजार 871 ऍक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या 18 लाख 4 हजार 871 जणांना डिस्चार्जही मिळाला आहे.
राज्यात आज 3580 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3171 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1804871 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 54891 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.5% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 24, 2020
तर मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग अद्याप नियंत्रणात असून चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण बाधित आढळण्याचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खालीच आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचे प्रमाण आणखी घसरले असून ते 12.73 टक्के झाले आहे. 643 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबईतील एकूण बाधितांची संख्या 2 लाख 89 हजारांवर गेली आहे. तर एका दिवसात 711 रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत 2 लाख 69 हजार म्हणजेच 93 टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.