#CWC19 : आमच्या खेळाडूंमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करण्याची क्षमता – गिब्सन

लंडन – विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तान-द.आफ्रिका आमनेसामने असतील. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताकडून सपाटून मार खाल्यानंतर पाकिस्तान संघ हा कडवट टीकेचा धनी झाला आहे. उर्वरित प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांना आज दक्षिण आफ्रिकेशी लढत द्यावी लागणार आहे. स्पर्धेतील बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी पाकिस्तानप्रमाणेच आफ्रिकेलाही हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. त्यापूर्वी आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटीस गिब्सन यांनी आपल्या संघाबदल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ते म्हणाले,आमच्या खेळाडूंमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करण्याची क्षमता आहे. मात्र त्यांनी या क्षमतेइतके कौशल्य दाखविलेले नाही. त्यामुळेच त्यांना चार सामने गमवावे लागले आहेत. अजूनही आम्हाला बाद फेरी गाठण्याची संधी आहे. त्याचा फायदा आम्ही निश्‍चित घेणार आहोत. भारताकडून पराभूत झाल्यानंतर अद्याप पाकिस्तानचे खेळाडू सावरलेले नाहीत. आम्ही त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न करू असे आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटीस गिब्सन यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.