सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील वाघळवाडी वाघळवाडी सोमेश्वरनगर येथे दि. 19 रोजी शिवजयंती शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत साजरी करण्यात येणार आहे. श्रीमंत अंबामाता ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे.
किल्ले सिंधदुर्ग येथे अंबामाता मंदिर येथून प्रस्थान करण्यात येणार असून ज्योतीची मशाल घेऊन सर्व मंडळातील सदस्य धावत ज्योत वाघळवाडी गावात घेऊन येणार आहेत.
ज्योतीचे आगमन होताच रॅलीचे आयोजन नीरा ते सोमेश्वर कारखाना येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून वाघळवाडी येथे ज्योतीचे आगमन होणार आहे. (दि.20) रक्तदान शिबिर, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.