नगर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी

 नगर -जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असून, 27 ते 29 सप्टेंबर रोजी विजेच्या कडकडाट व वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीची शक्‍यता वर्तविण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.

जिल्ह्यात सध्या गोदावरी, भीमा नदीत मोठ्या प्रमाणात विर्सग सुरू आहे. येत्या तीन दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्‍यता असल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होऊन नद्याची पाणी पातळी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरकरावे. 

नदी, नाले, ओढ्या काठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. नागरिकांनी नदीपात्र, ओढ्याच्या पाण्यात जाऊ नये. जुन्या-मोडकळीस आलेल्या इमारतीचा आश्रय घेऊ नये. भूस्सखलन, दरडी कोसळण्याची शक्‍यता असल्याने डोंगरपायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. विजेचा खांब, विद्युत रोहित्राजवळ थांबू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.