मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर करून या विषयीचा सस्पेन्स दूर केला आहे. पक्षाने भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ही दोन नावे पक्षाने फायनल केली असल्याचे सांगण्यात येते. पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
येत्या 20 तारखेला विधान परिषदेची निवडणूक होत आहे. त्यात आमदारांच्या संख्याबळानुसार कॉंग्रेसची एक जागा निश्चित निवडून येईल पण दुसऱ्या जागेसाठी कॉंग्रेसला मोठी कसरत करावी लागणार आहे.
सध्या महाविकास आघाडीच्या आमदारांचा आणि नेत्यांचा मुंबईतील ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये मुक्काम आहे. तेथे उमेदवार निवडीविषयी बैठका झाल्या आणि काही वेळातच या नावांची घोषणा करण्यात आली.