मुंबई – मुंबईत यापुढे देशी झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील मातीचे स्वरूप पाहता देशी प्रजातींचीच झाडे लावण्याच्या धोरणावर वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
यापुढे मुंबईत पालिकेतर्फे तामण, बहावा, करंज, चंपा, बकुळ, कडुनिंब यांसारखी देशी झाडेच लावण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांनी त्यांच्या सोसायटीच्या आवारात देशी प्रजातींचीच झाडे लावावीत, असे आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. मुंबईत यापुढे वृक्षारोपण करताना देशी प्रजातींची मातीत लवकर रुजतील अशीच झाडे लावली जाणार आहेत.
मुंबईत पावसाचे प्रमाण मोठे असते त्यामुळे काही विदेशी झाले येथील मातीत रुजत नाहीत व त्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात अशी झाडे उन्मळून पडण्याच्या घटनाही वारंवार घडतात. त्यामुळे देशी झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.