शासकीय भरतीसाठी ‘ओन्ली एमपीएससी’

उमेदवारांची ऑनलाइन मोहीम : मंत्र्यांना ई-मेल, मेसेज 

पुणे – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी “आता नाही तर कधीच नाही’ ही ऑनलाइन मोहीम सुरू करीत शासकीय भरतीसाठी “ओन्ली एमपीएससी’ अशी मागणी केली आहे. तसेच ईमेल, मेसेज व सोशल मीडियावरून राज्यातील मंत्र्यांना पाठविले आहेत.

मंगळवारपासून सुरू झालेली ही ऑनलाइन मोहीम 14 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. आरोग्य विभागातील भरती खासगी एजन्सीद्वारे घेण्यात आली होती. त्यात गैरप्रकार निदर्शनास आल्याने याविरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, यासह 16 जणांना ई-मेल व मेसेजद्वारे उमेदवारांनी मागणी केली आहेत. तसेच सोशल मीडियावर त्यांना हॅशटॅग करून याकडे लक्ष वेधत आहेत.

यामध्ये आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून ती एमपीएससीकडूनच घ्यावी, 2021 वर्षातील पदभरतीसाठी जागा काढाव्यात, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी अशा मागण्या केल्याचे एमपीएससी स्टुटंड्‌स राइटसचे महेश बडे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.