औंध – सध्या संपूर्ण देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वसामान्य नागरिकांना ही महागाई परवडणारी नाही कोरोनाच्या काळात संपूर्ण जग व देश पिछाडीवर पडला त्यावेळी महाविकास आघाडीने योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतले हे निर्णय घेत असताना गोरगरीब व सर्वसामान्यांच्या हिताचे आणि त्यांना परवडणारे असे निर्णय घेतले हे आपण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे त्यामुळेच महाविकास आघाडीच फक्त गोर – गरीब व सर्वसामान्यांना न्याय देऊ शकते त्यामुळे येत्या काळात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे राहुल बालवडकर , बाबुराव चांदेरे असे लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा आपली सेवा करण्यासाठी निवडून द्या असे जाहीर आव्हान जुन्नर तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल बेनके यांनी केले.
बाणेर,बालेवाडी,सुस व म्हाळुंगे,पाषाण,सुतारवाडी, औंध,सोमेश्वरवाडी व बावधन परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी बालेवाडी येथे राहुल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा व राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी अतुल बेनके यांच्या शुभहस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले त्यावेळी बेनके बोलत होते. बाणेर, बालेवाडी,पाषाण व औंध या परिसराचा गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपाच्या नगरसेवक ,आमदार, खासदारांनी काय विकास केला याचा आपण सर्वांनी बारकाईने विचार करून येत्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांना त्यांची जागा दाखवा असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.
तर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारा व्यक्ती म्हणून राहुल बालवडकर यांचे कौतुक करू तेवढे कमीच आहे अश्या शब्दात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी आपले मत व्यक्त केले.
नागरिकांची सेवा करणे म्हणजे आपल्या माता-पिता व भगवंताची सेवा केल्याचे समाधान मला मिळते त्यामुळे भविष्यात हा ठेवा मी कायमस्वरूपी जपेल असे मत राहुल बालवडकर यांनी व्यक्त केले.
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे मान्यवर पै.शिवराज राक्षे, पै. शंतनू बांदल,पै.शिवराज बालवडकर, बाबुराव चांदेरे फाउंडेशन- नांदेड, प्रकाशतात्या बालवडकर फाउंडेशन स्पोर्ट्स,महेंद्र बालवडकर, चेतक स्पोर्ट्स संघ, ह.भ.प. विलासतात्या बालवडकर, मारुती कांबळे, कुमारी सावरी शिंदे,कु.संजोग तापकीर व सुयोग तापकीर, गौरव भोसले, राजेंद्र ताम्हाणे इत्यादी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला .
याप्रसंगी आमदार अतुल बेनके,शहराध्यक्ष प्रशांत जगताप,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे,मा. नगरसेविका सायली वांजळे, रोहिणी चिमटे, गणपतराव बालवडकर,अंकुशराव बालवडकर,निलेश पाडाळे,डॉ.सागर बालवडकर,नितीन कळमकर,समीर चांदेरे,पूनम विशाल विधाते,सुषमा ताम्हाणे,राखी श्रीराव तसेच राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.