मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगात राजकीय घडामोडी घडताहेत. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षांवर सुनावणी देखील सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे देखील लवकरच बिगुल वाजणार आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. येत्या ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने वर्धापन दिनाचा टीजर मनसेच्यावतीने जारी करण्यात आला आहे.
मनसेने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये राज ठाकरे यांची काही वाक्य ऐकायला मिळत आहेत. ‘महाराष्ट्राच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करू नका.. या शिवरांचा तिसरा नेत्र जर उघडला तर सर्वजण भस्मसात व्हाल’ असं बोलताना राज ठाकरे दिसत आहेत. यासोबतच अमित ठाकरे यांची झलक देखील यामध्ये पाहायला मिळते.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या सोशल मीडियावरून हा टीजर शेअर केला आहे. ‘प्रतीक्षा नऊ मार्चची’ असे कॅप्शन यावेळी देशपांडे यांनी यावेळी दिले आहे. वर्धापन दिनानिमित्त मनसे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. यासाठी नवं मनसे सॉंग देखील टीजरमध्ये ऐकायला मिळत आहे.
प्रतीक्षा नऊ मार्चची pic.twitter.com/FDN5nSgtIm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 1, 2023
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मनसेची वाटचाल नेमकी कशी असणार ? कोणत्या पक्षासोसोबत युती होणार कि स्वतंत्र लढणार ? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे मनसैनिकांनी यावेळी मिळतील अशी अपेक्षा आहे.