आज-काल कविता करायलाही मी घाबरतो,
कारण तुझाच विचार कायम मनात येतो.
विषय कोणताही सुरू केला,
तरी तो तुझ्यावरच येऊन संपतो.
तुझ्याशी बोलणे ही माझ्यासाठी आहे एक पर्वणी,
जी मी कधीच सोडत नसतो.
आणि तुझ्याबद्दल तुलाही कळू नये,
म्हणून लिहिलेल्या खुपशा ओळी मी पुसतो.
सांगून टाकावे असे वाटते तुला की,
मग नेहमीच मी घाबरतो.
आणि ही अवस्था माझी नसून माझ्या एका मित्राची आहे,
असे प्रत्येक एकतर्फी प्रेमी म्हणतो.
– अनि__रूध्द
मास्टर्स इन ऑपरेशनल एक्सलंन्स,
होफ युनिव्हर्सिटी ऑफ अप्लायड सायंन्स, होफ, जर्मनी