सातारा (प्रतिनिधी) : दुबई येथून प्रवास करुन आलेल्या सातारा जिल्ह्यातील २९ वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ चा अनुमानित रुग्ण म्हणून आज दाखल करण्यात आले आहे. त्याला खोकला आणि घशात दुखत असल्याने सध्या विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्याच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
चिली या देशातून प्रवास करुन आलेल्या सातारा जिल्ह्यातील ३४ वर्षीय युवकाला आज यापूर्वीच दाखल करण्यात आले आहे. त्याच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.