सभापती प्रवीण माने यांची माहिती
भिगवण -पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथील दिगंबर जैन मंदिरास दहा लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी दिली. सभापती माने म्हणाले की, भगवान महावीर यांनी मानवाला समृद्ध जीवनाचा मार्ग दाखविला आहे. महावीरांच्या विचारांचे आचरण केल्यास आदर्श समाजाची निर्मिती होईल. अहिंसेचा सूत्र त्यांनी समाजात रुजवले आणि समाजाला एक नवी दिशा दिली.
यावेळी सभापती प्रवीण माने यांनी मंदिर प्रशासनास असणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. मंदिर आणि परिसर विकासासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक सचिन बोगावत यांनी केले. सूत्रसंचालन पंकज दोशी यांनी केले तर अमोल शहा यांनी आभार मानले. या निधीचा उपयोग लवकरच मंदिर आणि विकासासाठी करण्यात येणार असल्याने विश्वस्तांतर्फे सांगण्यात आले.
दिगंबर जैन समाजाच्या वतीने प्रवीण माने यांचा पराग गांधी, विशाल गांधी, नीलेश दोभाडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मेघचंद्र दोशी, उपाध्यक्ष अनिल दोशी, डॉ. सुभाष दोभाडा, प्रदीप वाकसे, जयदीप जाधव, अजिंक्य माडगे आदी मान्यवर उपस्थित होते.