जामखेड – जामखेड पासून सात किलोमीटर अंतरावर सौताडा घाटामध्ये अंबाजोगाई येथुन जामखेड कडे येत असताना साखरेने भरलेले ट्रक वळणावर पलटी होऊन त्यामध्ये एक जणांना जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाले आहेत
ट्रक चालक लायक शब्बीर पठाण (वय 43 रा ममदापूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड) हा जागीच ठार झाला तर अशोक तोरडमल (वय २४ रा मामदापुर तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड) हा जखमी झाला आहे .
आंबेजोगाई येथील रेनापुर शुगर कारखाना येथुन एम एच ४४ ८९५५ ट्रक साखर भरून पनवेल येथे टेककेअर एअर हाऊसला येथे साखर घेऊन चालला होता सौताडा घाटामध्ये रोडचा अंदाज न आल्याने गाडी घाटात दहा फुट खोल खड्ड्यात पलटी झाली यावेळी गाडीच्या किन्नर साईडला पडल्यामुळे तो वाचला आणि ड्रायव्हर स्टेअरिंग मध्ये अडकल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे .
घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आणि त्यांचे बंधू सुनील कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धावले असता जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील आणि तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना घटनेची माहिती दिली त्या आडकलेल्या संबंधिताच्या मदतीने पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे आणि यांच्या सहकार्याचे मदतीने मृतदेह ट्रकच्या आतील काही पार्ट तोडून बाहेर काढण्यात आला आहे .
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मृतदेह कोठारी यांनी जामखेड येथील सरकारी दवाखान्यात आणून दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे यावेळी महेश मोहोळकर ,वैभव म्हेञे, असलम शेख दत्ता वाराट आदींनी मदत केली. मृत व्यक्तीचा पोलीस पंचनामा करून येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज खराडे यांनी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.