शिंदे वासुली (वार्ताहर) –चाकण औद्योगिक वसाहत टप्पा दोनमधील वराळे, वासुली, भांबोली, शेलू आणि आसखेड गावामधील गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट व वैयक्तिक संरक्षक साधनांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर करोनाबाबत जनजागृती करण्यात आली. भांबोली ग्रामपंचायत हद्दीतील हंट्समन इंटरनॅशनल (इंडिया) प्रा. लि. कंपनीने सीएसआर निधीतून कृषी विकास संस्थेच्या सहकार्याने ही मदत करण्यात आली.
कंपनीचे राजकुमार दळवी, सचिन कांबळे, आशिष निघालं, कृषी विकास संस्थेचे राहुल जाधव, भांबोलीचे सरपंच सागर निखाडे, वासुलीच्या सरपंच इंदुबाई शेळके, माजी उपसरपंच सुरेश पिंगळे देशमुख, पोलीस पाटील अमोल पाचपुते आदी उपस्थित होते.
सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात अडचणीत सापडलेल्या शेकडो गरीब गरजू मजूर व कामगार कुटुंब, ठाकर आदिवासी समाज व स्थानिक आर्थिक दूर्बल कुटुंबांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे व करोना योद्ध्यांना संरक्षण किटचे आपर्यंत वाटप करण्यात आले आहे.