ओतूर (प्रतिनिधी) – डिंगोरे (ता.जुन्नर) येथे घराजवळ पाणी भरत असताना घराच्या अंगणात कोणीतरी खोडसाळपणे घाण टाकली. या कारणावरून विचारणा केली असता शेजारच्या दरेकर कुटुंबातील लोकांनी शिवीगाळ व दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि.29) कुंभारवाडा येथे घडली. दीक्षा सचिन सोनवणे (वय 38, रा. डिंगोरे, कुंभारवाडा), असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
दीक्षा सोनवणे यांच्या अंगणात कोणीतरी घाण टाकलेली होती. याविषयी शेजारी विचारणा केली. त्यावेळी शेजारी रेश्मा दरेकर व त्यांच्यात बाचाबाची झाली. दीक्षा यांनी अंगण साफ करून निघून गेल्या. सकाळी पावणेदहाच्या सुमारास दीक्षा सोनवणे घरात स्वयंपाक करीत असताना अक्षय दरेकर हा घरामध्ये आला. त्याने दीक्षाला ओढू लागला.यावेळी दीक्षा यांनी त्यास प्रतिकार करीत आरडाओरडा केला. त्यावेळी अक्षय बाहेर पळून गेला.
रेश्मा दरेकर, नितीन रामदास सोनवणे, इतर लोक दीक्षा सोनवणे यांना शिवीगाळ करू लागले. यावेळी अक्षय संतोष दरेकर, नितीन रामदास सोनवणे, रामू नथू सोनवणे यांनी दगड, विटा फेकून मारल्या. यात दरवाजा तोडून त्यांच्यावर हल्ला केला. यात दीक्षा जखमी झाल्या.
रेश्मा संतोष दरेकर, अर्चना कदम, शोभा रामदास सोनवणे या तिघीनींही मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. दीक्षा यांनी पती सचिन चिंतामण सोनवणे यांना बोलावून घेतले. त्यांच्यासोबत ओतूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास जमादार भवारी करीत आहेत.