मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि तब्बल 15 हजार कोटी रुपये खर्चुन अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आता मनसे आक्रमक झाली. अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे येथून या यात्रेला सुरुवात होते आहे. मनसेच्या आठ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून पदयात्रा असून असून या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये होणार आहे. त्यानंतर कोलाडमध्ये जागर यात्रेच्या संगमस्थळी राज ठाकरे भाषण करणार आहेत.
दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधतानामोठं विधान केले आहे ते म्हणाले,’पुढच्या वर्षी राज ठाकरे सत्तेत आले की, हा रस्ता संपूर्णपणे नीट झालेला पाहायला मिळेल. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेला कामाचा फटका हा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी तसेच कोकणवासीय जनता आणि पर्यटक यांना बसत आहे. तमाम कोकणवासीयांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकारे आंदोलन करत आहे. आणि निवेदन देखील प्रशासनाकडे सादर करत आहे. तर कधी लोकशाही पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली जात आहे.