नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन आणि लोकापर्ण सोहळा सध्या सुरु आहे. या ऐतिहासिक वास्तूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येत आहे. दरम्यान हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी या दिवशी अर्थ मंत्रालयाकडून विशेष ७५ रुपयांचे नाणे लॉन्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नव्याने लॉन्च करण्यात येणाऱ्या या नाण्यावर या नवीन संसद भवनाची प्रतिमा तसेच त्याचे नाव देखील देण्यात येणार आहे. नवीन संसदेच्या इमारतीचे उद्घाटन २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अअधिसूचनेनुसार, 75 रुपयांचे नाणं गोल आकाराचं असेल आणि त्याचा व्यास 44 मिमी असेल. 75 रुपयांचं हे नाणं चार धातूंच्या मिश्रणातून बनलेलं असेल, ज्यामध्ये 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के झिंक वापरलं जाणार आहे. या नाण्याचं वजन 35 ग्रॅम असेल. भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीत हे नाणं बनवण्यात आलं आहे.
नाण्याच्या पुढील बाजूच्या मध्यभागी अशोक स्तंभ आणि सत्यमेव जयतेचा लिहिलेलं असेल. नाण्यावर देवनागरी लिपीत भारत आणि इंग्रजीमध्ये India असं लिहिलेलं असेल. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवनाचे चित्र कोरलेलं असेल आणि त्याखाली 2023 हे वर्ष लिहिलं जाईल. संसद भवनच्या वरच्या बाजूला हिंदीत ‘संसद संकुल’ आणि खालच्या बाजून इंग्रजीमध्ये ‘Parliament Complex’ लिहिलेलं असेल. नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असेल.
तर नाण्याच्या समोरच्या बाजूस मध्यभागी अशोक स्तंभावरील सिंह आणि सत्यमेव जयते लिहीलेलं असेल. नाण्यावर देवनगरी लिपीत भारत आणि इंग्रजीत इंडिया लिहिलेलं असेल. तसेच संसद भवन हे शब्द देखील देवनागरी आणि इंग्रजी भाषेत दिले जातील. नाण्याचं डिझाईन संविधानातील पहिल्या अनुसूचीत दिलेल्या सूचनांनूसार असेल.