पुणे – भारतीय जनता पार्टीचा माथाडी शहर उपाध्यक्ष अक्षय वरघडे, यांच्या वाढदिवसाची पार्टी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातल्या शेतमाळा लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आला होत. या वेळी वाढदिवसा दरम्यान मुलं हुल्लड बाजी करत होती ही माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलिसानी जाऊन थेट ॲक्शन घेतली. यामध्ये अनेक तरुण जखमी झाले असून पोलिसानी काहींच्या गाड्या, मोबाईल जप्त केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या तरुणांनी या घटनेचा निषेध करत मोठ्या संखे मोर्चा बिबवेवाडी पोलीस स्टेशनला काढला.
शेतमाळा लॉन्स परिसरात वाढदिवसाला तरुणांची मोठी गर्दी जमली होती. व मोठमोठ्याने स्पीकर देखील सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस कॉन्ट्रोला कॉल गेला आसताना स्थानिक मार्शल पोलिसानी घटनास्थळी पोहचले. आणि जमाव पांघरवण्याचा प्रयत्न केला. पळा पळी मध्ये धक्का बुक्की झाली आणि अनेक तरुण जखमी झाले, या मध्ये पोलिसानी अनेक तरुणांना लाटी चा प्रसाद दिला, आणि काही तरुणांचे गाड्या व मोबाईल जप्त केले.
याचा जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये मोठा मोर्चा काढला, या मध्ये कॅन्टोन्मेंट चे आमदार सुनील कांबळे यांनी ही बिबवेवाडी पोलीस स्टेशनला भेट दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी झोन पाच चे पोलीस उप आयुक्त विक्रांत देशमुख थेट बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले. व या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी बिबेवाडी पोलीस निरीक्षक संगीता जाधव याना आदेश दिलेत.