नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (11 डिसेंबर) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि शाळकरी मुलांसोबत मेट्रोमध्ये फेरफटका देखील मारला होता. तसेच, यावेळी त्यांनी नागपुरात अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. सर्वप्रथम त्यांनी नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला नागपूर रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला.
ही ट्रेन सुरू झाल्याने प्रवाशांना नागपूर ते बिलासपूर दरम्यान पूर्वीपेक्षा कमी वेळेत प्रवास करणे शक्य होणार आहे. मात्र, नुकत्याच सुरु झालेल्या या ‘नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस’ ट्रेनवर दगड फेक करण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने या ट्रेनच्या खिडकीवर दगड फेक केल्याचं आढळून आलं आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे च्या रायपूर विभागांतर्गत दुर्ग आणि भिलाई नगर रेल्वे स्थानकांदरम्यान ही सेमी हाय स्पीड ट्रेन राज्यातील बिलासपूरला जात असताना बुधवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचे रेल्वे अधीकऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे ट्रेनच्या E1 कोचच्या खिडकीचे नुकसान मोठे नुकसान असून, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. असं देखील सांगण्यात आलं आहे. सध्या पोलीस अधिकारी या घटनेचा पुढील तपास करत आहे.