नवी दिल्ली : लेखिका, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यातच आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या गाणं गात त्या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहे.
गायिका श्रेया घोषालबरोबरचा ‘बरसो रे मेघा’ या गाण्यावर सुधा मूर्ती नाचताना आणि गातानाचा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ १४ डिसेंबर रोजी बेंगळुरू येथे इन्फोसिसच्या एका कार्यक्रमामधील आहे. यात त्यांनी श्रेयासह आणखी काही लोकांच्या उपस्थितीत गाणं म्हणत आणि त्यावर सुद्धा मूर्ती डान्स करत आहेत.
Omg..!!!🙏🏻 legend’s Sudhamurthy amma & Shreyaghoshal di
. #SudhaMurty mam @shreyaghoshal #Infosys #ShreyaGhoshal #Legends
.
(Sudha amma dances her heart out on ‘Barso Re Megha’ with shreya di💃🏻🔥) pic.twitter.com/MmtT1CvZtt— 💕𝑺𝒉𝒓𝒆𝒚𝒂_𝑺𝒖𝒔𝒉💕 (@Sush36068856) December 15, 2022
श्रेया सुश नावाच्या एका युजरने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्या २००७ मध्ये आलेल्या ‘गुरू’ चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘बरसो रे मेघा’ श्रेया घोषालबरोबर उत्साहात आणि आनंदात गाताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
दरम्यान, इन्फोसिस कंपनीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात श्रेया घोषालसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात सुधा मुर्ती यांना गाणं म्हणायचा आणि डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद लुटल्याचे व्हिडीओतून दिसून येत आहे.