मुंबई- बॉलिवूडचा रिअल लाईफ हिरो म्हणजे, अभिनेता ‘सोनू सूद’ हा गेल्या काही महिन्यांपासून अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. आता मात्र सोनू सूद विरोधात जुहू पोलीस ठाण्यात मुंबई महापालिकेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली करण्यात अली होती आहे. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानगी न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आल्यामुळे ही नोटीस देण्यात आली आहे.
या मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसला सोनू सूदने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने बुधवारी या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. मिळालेल्या माहितीनुसार, सोनूने या प्रकरणात आपली बाजू मांडली असून पालिका आपल्याबरोबर भेदभाव करत असल्याचा आरोप केला. मी राहत असलेल्या इमारतीमध्ये कुठलेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. या इमारतीचे बांधकाम बांधकाम १९९२ मध्ये झाले आहे . तेव्हापासून ही इमारत आहे तशीच आहे.
दरम्यान, पालिकेने सोनू सूद विरोधात 4 जानेवारील तक्रार दाखल केली होती. बांधकामाबाबत नोटीस देऊन सुद्धा सोनू सूदने बांधकाम सुरूच ठेवले त्यामुळे पालिकेने पोलिसात तक्रार केली होती. पालिकेच्या या कारवाईला सोनू सूद कशा प्रकारे सामोरा जाईल याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.