पुणे ग्रामपंचायत निवडणूक : कोण होणार राजा; कोणाचा वाजणार बाजा?

 प्रचाराच्या तोफा थंडावल्या : गल्लीत पायपीठ अन्‌ भेटागाठींवर जोर

– राहुल गणगे

पुणे – ग्रामपंचायत निवडणुकांसाठी गेल्या 10 दिवसांपासून सुरूअसलेल्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सांयकाळी थंडावल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील 650 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. 15) मतदान होणार आहे. त्यामुळे उमेदवारांचा आजपासून पायपीठ आणि भेटीगाठींवर जोर सुरू झाला आहे. परंतु आजच्या रात्रीत कोण होणार राजा अन्‌ कोणाचा वाजणार बाजा याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मतदानाची सर्व तयारी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. दरम्यान,पोलिसांनी गावागावांतून संचलन करत निवडणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे.जिल्ह्यात या निवडणुकीत 2 हजार 31 प्रभागासाठीजवळपास 11 हजार 7 उमेदवार रिंगणार आहेत. तर 81ग्रामपंचायती बनविरोध झाल्याने 746 पैकी 650ग्रामपंचयातीसाठी निवडणुका लागल्या आहेत. (दि. 4) तारखेनंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली. उमेदवारांनाप्रचारासाठी केवळ 9 दिवस मिळाले. या निवडणुकीत अनेक गावकी-भावकी, बहिणी-बहिणी, भाऊ-भाऊ, काका-पुतणे एकमेकांच्या विरोधात निवडणूकरिंगणात उभे आहेत. प्रत्येक उमेदवाराने मतदारापर्यंत पोहचण्यासाठी नऊ दिवसांत जिवाचे रान केले.

अटीतटीच्या लढतीत उमेदवारांचे लक्ष प्रत्येकमतदारांकडे आहे. परगावच्या मतदारांवर उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी कार्यकर्त्यांची विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पुणे-मुंबई येथील मतदारांसाठी खासगी वाहनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. नागरिकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन, रॅली, सभा, कोपरा सभा, जाहिर सभा घेतमतदारांना मतदानासाठी साद घालण्याचा प्रयत्न केला.

गावाबाहेर असलेल्या मतदारांनाही प्रत्यक्ष संपर्क मतदानाच्या दिवशी गावात येत गावाच्या विकासासाठीमतदान करण्याचे आवाहन उमेदवारांनीकेले. गावागावातील वातावरण प्रचाराने दणाणून गेले आहे. उमेदवार व कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागातील गल्लीबोळ, वाडी-वस्त्या पिंजून काढला आहे. प्रत्येक उमेदवारासाठी कार्यकर्त्यांची फौज रात्रीचा दिवस करीत आहे.

प्रत्येक प्रभागात एकेका मतदाराला लाख मोलाचा भाव आला आहे. त्यासाठी उमेदवारांनी परगावच्या मतदारावर लक्ष केंद्रित करून विशेष यंत्रणा राबवली आहे. नोकरी, व्यवसाय, आणि बदलीमुळे अनेक मतदार परगावी आहेत. शिक्षणासाठीही परगावी असणाऱ्या युवा मतदारांची संख्या अधिक आहे. सर्वाधिक मतदार पुणे,मुंबईला आहेत. त्यामुळेच परगावच्या मतांना सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे परगावचे मतदार आणण्यासाठीउमेदवारांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

मतदारांवर सोशलमधून मेसेजचा पाऊस
सर्व उमेदवारांनी प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. प्रत्येक मतदाराला व्हॉट्‌स्‌ऍप, मेसेजद्वारे मतदानासाठी विनंती करण्यात येत आहे. त्यासाठी गेले दोन दिवसांपासून सर्वच उमेदवारांनी आपापल्या मतदारांना मोबाइल संदेश पाठविले जात आहेत. तर काहींनी फोन करुन आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक उमेदवारांकडून परगावच्या मतदारांवर मेसेजचा पाऊस सुरू झाला आहे. यामधून मतदारांवर आपल्यालाच मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

कोण फडकवणार झेंडा 
मतदानासाठी उमेदवारांनी प्रचारात जिवाचे रानकेले असले तरी शुक्रवारी मतदान झाल्यानंतरच कोणाचे पारडे किती जड आहे. तसेच कोणाचा नेता किती पावरफुल्ल हे स्पष्ट होणार आहे. उमेदवारांनी दिलेल्याआश्‍वासनांचा मतदार राजावर काय परिणाम होणार आहे. तसेच शेवटच्या रात्रीत कोणाचे नशीब बदलणार हे सोमवारी (दि. 18) तारखेला मत-मोजणीच्या दिवशीच कळणार आहे. त्यामुळे (दि. 26) जानेवारीला कोण झेंडा फडकवणार याकडे गाव नेत्यांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.