ओमायक्रॉनचा फैलाव! आतापर्यंत 5 राज्यात आढळले 21 रुग्ण; लस घेतलेलेही व्हेरियंटच्या विळख्यात

नवी दिल्ली :  करोनाच्या नव्या व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे.  भारतातही या व्हेरियंटने एंट्री केल्याने  चिंतेत भर पडली आहे.  आता ओमायक्रॉन आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. केवळ चारच दिवसात भारतात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे. 2 डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तर 6 डिसेंबरपर्यंत या व्हेरियंटची संख्या 21 वर पोहोचली आहे.त्यामुळे आता आरोग्य विभागासमोर नवे आव्हान उभे टाकले आहे.

रविवारी एका दिवसात ओमायक्रॉनचे नवे 17 रुग्ण देशात आढळून आले. राजस्थानच्या जयपूरमध्ये 9, महाराष्ट्रात 7 आणि राजधानी दिल्लीमध्ये 1 या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंट राजधानी दिल्लीसह 5 राज्यात फैलावला आहे. अशातच देशातील एकूण ओमायक्रॉनची संख्या 21 वर पोहोचली आहे. सर्वाधिक 9 रुग्ण राजस्थानमध्ये आहे, तर 8 रुग्ण महाराष्ट्रात, 2 रुग्ण कर्नाटकात, तर दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 1-1 रुग्ण आहे.

दक्षिण अफ्रीकामधून राज्यस्थानमध्ये आलेल्या कुटुंबाच्या जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) तपासात नऊ जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे समोर आले. आरोग्य सचिव वैभव गालरिया म्हणाले की, दक्षिण आफ्रिकातून आलेल्या कुटुंबाला आणि त्यांच्या संपर्कातील ओमायक्रॉन रुग्णांना उपचारासाठी आरयूएचएसमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांमध्ये सध्या सौम्य लक्षणं जाणवत आहेत.

जगभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटव्हेरियंटव्हेरियंट चिंतेचा विषय बनला असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट कोरोनाच्या  इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याबाबत अधिक निष्कर्षासाठी आणि व्हेरियंटची संरचना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल असेही त्यांनी पुढे सांगितले  आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.