पॅरिस : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतीच दरवर्षाप्रमाणे या वर्षाच्या शेवटीही प्रदीर्घ पत्रकार परिषद घेतली. पुतिन यांची ही पत्रकार परिषद एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल चार तास सुरु होती. या पत्रकार परिषदेमध्ये पुतिन यांनी अनेक विषयांवर भाष्य केल्याचे पहायला मिळाले. पुतीन यांच्या या प्रदीर्घ पत्रकार परिषदेचे जगभरातून कौतूक करण्यात येत आहे.
I just learned that Putin held a 4 hour press conference and holds them regularly. Our president can’t take more than 5 questions without letting us know he’s not supposed to be taking questions. #freedomofthepress
— Stu Varney’s Lovechild (@StuVarneys) December 26, 2021
पुतिन यांनी पत्रकार परिषदेमध्ये युक्रेनवरुन पाश्चिमात्य देशांना थेट इशारा दिला. नाटोचा विस्तार युक्रेनपर्यंत करुन सुरक्षेची हमी देण्याची आपली मागणी पूर्ण केली जात नसेल तर आपण वेगळ्या मार्गांचा विचार करु असं पुतिन म्हणाले आहेत. मध्य पूर्व युरोपमध्ये नाटोने तैनात केलेले सैन्य मागे घ्यावं अशी मागणी काही आठवड्यापूर्वी रशियाने केलेली.
Putin just gave a 3.5 hour press conference. Open questions….
Joe just walks away….
Strength vs weakness. pic.twitter.com/up5NTkEZZ0
— andrew talbot (@andrewt65269115) December 23, 2021
पाश्चिमात्य देशांनी आमच्यासंदर्भात आक्रमक भूमिका कायम ठेवली तर आम्ही सुद्धा योग्य ती लष्करी आणि व्यापारी पावले उचलू असे पुतिन म्हणाले. रशियाच्या सरकारी वृत्तवाहिनीवरुन पुतिन यांची पत्रकार परिषद लाइव्ह दाखवण्यात आली. यापूर्वीही पुतिन यांनी अशाप्रकारच्या प्रदीर्घ पत्रकार परिषदा घेतल्याची उदाहरणे आहेत.
Even the autocratic Putin faces press for 4 hours, taking every question but our democratically elected (autocrat) Modi refuses to face press for 7 years. Instead he spend his day changing 5 attires a day design by expensive designer at cost of public money.#WaahModijiWaah
— Tommy 🏹 (@ThomasfucShelby) December 24, 2021
एकीकडे आमचे नेते पाच प्रश्नांनाही उत्तर देऊ शकत नसताना हा नेता चार तास पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जातो हे कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.