बारगढ – ओडिशातील बालासोर दुर्घटनेला तीन दिवस झाल्यानंतर पुन्हा रेल्वेसेवा सुरळीत झाली असतानाच पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे. ओडिसा राज्यातील बारगढ जिल्ह्यात एका मालगाडीचे पाच डबे रुळावरुन घसरले आहेत. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
ओडिशा राज्यातील बारगढ जिल्ह्यातील मेंधापळी येथे ही र्दुघटना घडली आहे. मालगाडी आणि त्यातील सामानाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. रुळावरुन घसरलेली अपघातग्रस्त मालगाडी डुंगुरीहून बारगढकडे जात होती. चुनखडी घेऊन निघालेल्या या मालगाडीला सांबरधराजवळ अपघात झाला. या गाडीचे अनेक डबे रुळवरुन घसरले.
VIDEO | A goods train derailed in Odisha’s Bargarh earlier today. More details are awaited. pic.twitter.com/WrTjpIojhF
— Press Trust of India (@PTI_News) June 5, 2023
चुनखडीच्या खाणी आणि बारगढच्या सिमेंट प्लांट दरम्यान खासगी नॅरोगेज रेल्वे मार्ग आहे. हे मार्ग लाइन, वॅगन आणि लोको खासगी असल्याने ते भारतीय रेल्वे प्रणालीशी जोडलेले नाहीत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.