Train accident । राष्ट्रीय राजधानीतील सराई रोहिल्ला रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी मालगाडीच्या दहा बोगी रुळावरून घसरल्या, त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. शनिवारी सकाळी जाखिरा उड्डाणपुलाखालून ट्रेन जात असताना ही घटना घडली.
रेल्वे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत १० बोगी रुळावरून घसरल्या आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर तेथे तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. बचावकार्यासाठी रेल्वे पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
मालगाडीमध्ये लोखंडी पत्र्याचे रोल लोड करण्यात आले होते. रुळावरील एखाद्या व्यक्तीचा त्यात मृत्यू झाल्याची घटना नाकारण्यात येत नाही असे अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वेचे घसरलेले डबे हलवण्यासाठी तिकडे क्रेनही मागवण्यात आल्या आहेत.