NZ vs IND – न्यूझीलंडला दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात टीम इंडियाने यजमानांचा ६५ धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवच्या झंझावाती शतक आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीने भारताला या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली आहे. सामन्यात पराभव झाल्यानंतर बोलताना केन विल्यमसनने सूर्यकुमारच्या शतकीय खेळीचे कौतुक केले. याशिवाय सूर्यकुमार यादव हा जगातील सर्वोत्तम खेळाडू असल्याचेही विल्यमसनने म्हटले.
#NZvsIND | श्रेयस अय्यर स्वतःच्याच चुकीने आऊट झाला; पहा ‘हा’ व्हिडिओ!
केन विल्यमसन म्हणाला की, “सामना ( NZ vs IND ) जिंकण्यासाठी आम्ही आमचा सर्वोत्तम प्रयत्न केला नाही. सूर्यकुमारची खेळी अफलातून अशी होती. मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. त्याने या सामन्यात खेळलेले काही शॉट्स मी यापूर्वी कधीही पाहिलेले नाहीत. ते खरंच उत्कृष्ट फलंदाजी शैलीचे होते. आम्ही धावांच्या बाबतीत सूर्यकुमारला रोखू शकलो नाही आणि त्यानंतर फलंदाजीतही चांगली कामगिरी करता आली नाही.”
#NZvsIND | श्रेयस अय्यर स्वतःच्याच चुकीने आऊट झाला; पहा ‘हा’ व्हिडिओ!
विल्यमसनने पुढे बोलताना म्हटले की,”आजच्या सामन्यातील आमची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. मी पुन्हा सूर्यकुमारबद्दल म्हणेल की, त्याच्या खेळीने सामन्यात मोठा फरक पडला. दुसऱ्या डावात चेंडू थोडासा स्विंग होत होता आणि भारताच्या गोलंदाजांनी त्याचा फायदा घेतला. पुढील सामन्यात आम्हाला गोलंदाजी आणि फलंदाजीतही सुधारणा करावी लागणार आहे.” सूर्यकुमार यादवने या सामन्यात ५१ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने १११ धावांची शतकीय खेळी खेळली.
सामन्यात ( NZ vs IND ) सूर्यकुमार यादव भारताच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने सामान्यांच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना ५१ चेंडूत १११ धावांची तुफानी शातकीय खेळी खेळली. त्यामुळे भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात यजमान संघ १२६ धावांवरच सर्वबाद झाला. सामन्यातील जबरदस्त कामगिरीसाठी सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.