ICC World Cup 2023 Team New Zealand : विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत न्यूझीलंडची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्यांनी सुरुवातीचे चारही सामने जिंकले मात्र पाचव्या सामन्यात न्यूझीलंड संघाला भारताविरूध्द पराभवाला सामोरं जावं लागलं. तथापि, 14 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला जेव्हा नियमित कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे स्पर्धेतील साखळी सामन्यांमधून बाहेर पडला. तो संघासोबत तर आहे, पण यापुढील सामने तो खेळू शकेल अशी आशा फार कमी आहे.
दुखापतीमुळे बराच काळ बाहेर राहिल्यानंतर विल्यमसनने 13 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन केले. मात्र, परतीच्या सामन्यात त्याला पुन्हा दुखापत झाली. सामन्यादरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. मात्र, आता विल्यमसनने या प्रकरणाचे रहस्य उघड केले आहे. त्यांनी मजेशीर पद्धतीने एक पोस्ट टाकली आहे.
विल्यमसनने खलीसाठी केली एक पोस्ट…
विल्यमसन याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती आणि यामध्ये त्याचा अंगठा झाला फ्रॅक्चर झाला होता. या सामन्यानंतर केन विल्यमसन आणि खली यांची भेट झाली होती आणि त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं होतं. त्यांनतर या भेटीचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताना विल्यमसन याने गमंतीशीर पध्दतीने म्हटले आहे की, सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे नव्हे तर खलीसोबत केलेल्या या हस्तांदोलनामुळेच माझा अंगठा फ्रॅक्चर झाला.
View this post on Instagram
खरं तर, विल्यमसनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो WWE रेसलर द ग्रेट खलीसोबत हस्तांदोलन करताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये विल्यमसनने लिहिले आहे की, “जेव्हा माझा अंगठा प्रत्यक्षात (फ्रॅक्चर) तुटला. मात्र, खरे सांगायचे तर खलीने ज्याप्रकारे हस्तांदोलन केले ते खूपच मजबूत होते. खलीला भेटून आनंद झाला.”
बांगलादेशविरुद्ध विल्यमसनला झाली होती दुखापत…
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विल्यमसनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. वास्तविक, बांगलादेशी क्षेत्ररक्षकाचा थ्रो थेट धाव घेत असलेल्या विल्यमसनच्या अंगठ्याला लागला. यानंतर विल्यमसनला खूप वेदना होत होत्या. 2023 च्या विश्वचषकातील हा त्यांचा पहिला सामना होता. दुखापतीमुळे विल्यमसन रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्याने 107 चेंडूत 78 धावांची खेळी खेळली.
An X-ray has confirmed an undisplaced fracture to Kane Williamson’s left thumb.
He will remain in the @cricketworldcup squad with the aim of being available for the back end of pool play next month.
Tom Blundell will travel to India as cover. #CWC23 https://t.co/5CjHG0FV9h
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 14, 2023
स्पर्धेत विल्यमसन संघासोबतच राहणार…
सामन्यानंतरच्या तपासणीत त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले. न्यूझीलंड क्रिकेटने याची अधिकृत माहिती दिली होती. न्यूझीलंड क्रिकेटने एक्स(ट्विटर) पोस्टमध्ये लिहिले होते की,” केन विलियम्सनच्या एक्स रे रिपोर्टमधून डाव्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी, पुढील महिन्यात होणाऱ्या पूल लेग सामन्यांच्या अंतिम फेरीसाठी उपलब्ध राहण्याच्या उद्देशाने तो वर्ल्ड कप स्कॉडमध्ये कायम राहणार असल्याचं देखील न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितलं होतं.
मार्चमध्ये आयपीएलमध्येच विल्यमसनला झाली होती दुखापत…
या वर्षी 2023 मार्चमध्ये आयपीएलदरम्यान विल्यमसनलाही दुखापत झाली होती. गुजरात टायटन्सकडून खेळताना विल्यमसनचा खांदा फ्रॅक्चर झाला होता. यानंतर त्याला दुखापतीमधून सावरायला आठ महिने लागले. या विश्वचषकात त्याने पुनरागमन केले होते. शुक्रवारी विश्वचषक स्पर्धेत झालेला बांगलादेशविरुद्धचा हा त्याचा पहिलाच सामना होता आणि आता त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे.