Cricket Fab-4 Batsman Stats : न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार शतक झळकावले. केन विल्यमसनचे हे कसोटी सामन्यातील 29 वे शतक आहे. वास्तविक, विराट कोहलीशिवाय जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांची गणना फॅब-4 फलंदाजांमध्ये केली जाते. फॅब-4 फलंदाजांबद्दल बोलायचे तर, स्टीव्ह स्मिथने कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने 102 कसोटी सामन्यांमध्ये 32 शतके झळकावली आहेत.
फॅब-4 फलंदाजांमध्ये कोणी किती शतके ठोकली…
त्याचबरोबर या यादीत जो रूट दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या जो रूटने 135 कसोटी सामन्यांमध्ये 30 वेळा शतकाचा टप्पा ओलांडला आहे. यानंतर न्यूझीलंडचा केन विल्यमसन आहे. केन विल्यमसनने 95 कसोटी सामन्यांमध्ये 29 शतके झळकावली आहेत. फॅब-4 फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीने सर्वात कमी कसोटी शतके झळकावली आहेत. विराट कोहलीने 111 कसोटी सामन्यांमध्ये 29 शतके झळकावली आहेत.
Test century number 2️⃣9️⃣ for Kane Williamson! He becomes the first New Zealand player to score a century in four consecutive Tests and the second New Zealand player, behind Andrew Jones, to score a century in three consecutive Test innings 🏏#BANvNZ #CricketNation pic.twitter.com/1DA3TTMc0o
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 29, 2023
Most Test hundreds in Fab 4:
Smith – 32 (102 matches)
Root – 30 (135 matches)
Williamson – 29* (95 matches)
Kohli – 29 (111 matches)
IND vs AUS 3rd T20 : टीम इंडियाच्या पराभवाची ‘ही’ आहेत 5 मोठी कारणे
Kane Williamson : विराट कोहलीशिवाय जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांची गणना फॅब-4 फलंदाजांमध्ये केली जाते. फॅब 4 फलंदाजांबद्दल बोलायचे तर, स्टीव्ह स्मिथने कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावली आहेत.