न्यूयॉर्क – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बंद करण्यात आलेले ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ट्विटरचे नवे अध्यक्ष इलॉन मस्क यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.
ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात यावे का? याबाबत मस्क यांनी ट्विटरवर ऑनलाईन एक मते मागवली होती. याला 15,085,458 जणांनी होकारार्थी मत नोंदवल्यामुळे ट्रम्प यांच् ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या बाजूने 51.8 टक्के जणांनी मतदान केले, तर विरोधात 48.2 टक्के जणांनी मत नोंदवले आहे.
Colorado Springs shooting : कोलोरॅडोतील नाईटक्लबमधील गोळीबारात 5 ठार, 18 जखमी
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ट्रम्प समर्थकांनी संसदेच्या आवारात घुसून धुडगूस घातला होता. त्यानंतर ट्रम्प यांचे अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले होते. दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून प्रक्षोभक ट्विट केले होते.