नवी दिल्ली – भारतीय फुटबॉलमध्येही फिक्सिंगचे ग्रहण लागल्याचे समोर येत आहे. सीबीआयने पाच प्रख्यात फुटबॉल क्लबची चौकशी तसेच त्यांच्या व्यावहारांचा तपास सुरु केला असून या तपासाला सहकार्य करण्यासही खडसावले आहे. हे प्रकरण आय फुटबॉल लीगशी संबंधित असल्याचे व करोडो रुपयांचे व्यावहार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
#NZvsIND | “तो खेळतो तसे शॉट्स मी कधीही पाहिले नाहीत” विल्यमसनकडून सूर्याचे कौतुक!
केंद्रिय तपास यंत्रणेने (सीबीआय) सिंगापूरचा कुख्यात मॅचफिक्सर विल्सन राज पेरूमल याने 3 डी होल्डिंग्स लिमिटेड या शेल कंपनीच्या माध्यामातून भारतातील काही क्लबमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. पेरुमलवर ऑलिम्पिक, विश्वकरंडक, महिला विश्वकरंडक तसेच युरोप व आफ्रिकेतील फुबॉल लीगमध्ये गुंतलेला असल्याचे यापूर्वीच उघड झाले होते. आता त्याने बारतातही हातपाय हसरायला सुरुवात केल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.
#NZvsIND | “तो खेळतो तसे शॉट्स मी कधीही पाहिले नाहीत” विल्यमसनकडून सूर्याचे कौतुक!
पेरूमलला 1995 साली पहिल्यांदा सिंगापूरमध्ये मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खावी लागली होती. तसेच त्याच्यावर फिनलॅंड व हंगेरीतही गुन्हे नोंदले गेले आहेत. सीबीआयने संशय असलेल्या या सर्व पाचही क्लबशी संपर्क केला असून संघात परदेशी खेळाडू, परदेशी सपोर्ट स्टाफ व प्रायोजक यांची माहिती देण्यास सांगितले आहे. इंडियन सुपर लीग फुटबॉलनंतर भारतीय फुटबॉल क्षेत्रतील आय लीग ही दुसरी मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आता या तपासातून सर्व सत्य समोर येणार असून त्यानंतर कारवाईची दीशा स्पष्ट होणार आहे.