पुणे: थर्डआय करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत रोहित भोरे (2-9 व 72 धावा) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एनएसएफए (नाशिक) संघाने स्पार्टन क्रिकेट क्लब संघाचा 7 गडी राखून पराभव करत विजय मिळवला.
या स्पर्धेत स्पार्टन्स क्रिकेट क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 147 धावा केल्या. यात आलोक घोडके 41, रोहन पी 38, आदित्य परदेशी 38 यांनी धावा केल्या. एनएसएफएकडून रोहित भोरे 2-9, दर्शन सोनावणे 1-31 यांनी सुरेख गोलंदाजी करत स्पार्टन्स क्रिकेट क्लबला 147 धावांवर रोखले.
हे आव्हान एनएसएफए (नाशिक) ने 15.3 षटकात 3 बाद 148 धावा करून पूर्ण केले. यामध्ये रोहित भोरे 72 धावा, प्रतीक देवरे 33 धावा काढून संघाला विजयाचा पाया रचला. त्यानंतर राहुल पुरी नाबाद 20, शुभम शिंदे नाबाद 15 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी रोहित भोरे ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल – साखळी फेरी – स्पार्टन्स क्रिकेट क्लब – 20 षटकात 7 बाद 147. (आलोक घोडके 41, रोहन पी 38, आदित्य परदेशी 38, रोहित भोरे 2-9, दर्शन सोनावणे 1-31) पराभूत वि. एनएसएफए (नाशिक) 15.3 षटकात 3 बाद 148. (रोहित भोरे 72, प्रतीक देवरे 33, राहुल पुरी नाबाद 20, शुभम शिंदे नाबाद 15, ओंकार कडू 2-38, आदित्य परदेशी 1-25); सामनावीर – रोहित भोरे.