मयंक सिंह देशातील सर्वात तरुण न्यायाधीश

वयाच्या 21व्या वर्षीच सुनावणार न्यायालयात निकाल

नवी दिल्ली : एकवीस वर्षीय मंयक प्रताप सिंह हा तरुण विधी सेवा परीक्षा 2018 उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे तो आता देशातील सर्वात तरुण न्यायाधीश म्हणून न्यायालयात कामकाज पाहणार आहे. 21 व्या वर्षीच तो आता निकाल सुनावणार आहे. या अभुतपूर्व यशासाठी त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मयंक सिंह हा राजस्थानच्या जयपूर येथील रहिवासी आहे. आपल्याला कायमच कायद्याच्या सेवा आणि समाजात न्यायाधीशांना मिळणाऱ्या आदराचे आकर्षण होते. त्यामुळे न्यायाधीश होण्याचे माझे स्वप्न होते ते मी या परीक्षेद्वारे पूर्ण केले आहे.
मयंकने सन 2014 मध्ये राजस्थान विद्यापीठातून पाच वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. त्याचा हा कोर्स याच वर्षी पूर्ण झाला आहे. या यशामुळे मला स्वतःचाच अभिमान वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे. यासाठी त्याला कायमच प्रोत्साहन देणारे कुटुंब, शिक्षक आणि शुभचिंतकांचे त्याने आभार मानले आहेत.

मयंक आता कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी देखील एक प्रेरणास्त्रोत बनला आहे. सन 2018 पर्यंत विधी सेवा परीक्षांसाठी अर्ज करण्याची वयाची किमान वयोमर्यादा 23 वर्षे होती. मात्र, 2019 मध्ये राजस्थान हायकोर्टाने ही मर्यादा 21 वर्षे केली. परीक्षेची वयोमर्यादा घटवण्यात आल्यानेच आपण या परीक्षेला बसू शकलो असे मयंकने म्हटले आहे. या संधीमुळे मी वेळेपूर्वीच बऱ्याच गोष्टी शिकू शकेन, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)