मुंबई – शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात देखील दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत शिंदे- फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर विरोधकांकडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
“मुख्यमंत्री राजीनामा देणार!, सरकार पडणार!!, उबाठा मध्ये काही आमदार परत येणार!!!अजित दादांसोबतच्यांची आमदारकी धोक्यात!!! मीडियात अशा अफवा लाखात…पसरवणारे एकच ते महान “विश्वविख्यात”. हाच स्वभाव नडला आणि कारण नसताना आमचा बाप काढला. आता भोगा आपल्या कर्माची फळं!” असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
■ मुख्यमंत्री राजीनामा देणार!
■ सरकार पडणार!!
■उबाठा मध्ये काही आमदार परत येणार!!!
■ अजित दादांसोबतच्यांची आमदारकी धोक्यात!!!मिडियात अशा अफवा लाखात…
पसरवणारे एकच ते महान “विश्वविख्यात”हाच स्वभाव नडला आणि
कारण नसताना आमचा बाप काढला
आता भोगा आपल्या कर्माची फळं!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 7, 2023
6 जुलै रोजी देखील आशिष शेलार यांनी ट्वीट करत ठाकरे गटावर निशाणा साधला होता. त्यांंनी ट्वीटमध्ये लिहिले होते की, ‘…या प्रस्तुत प्रसंगी “जाणता राजा” हरला नाही, तर तो जिंकला… हे सांगण्यासाठी दरबारी राजकारणात “भाट” ठेवलेले असतातच… वेगवेगळ्या “माध्यमातून” भाट आपलं काम चोख करीत आहेत. विश्वविख्यात प्रवक्ते आणि शापित दरबारी प्रभादेवीच्या गल्लीत बसून सांगतात की, हा तर दिल्लीचा डाव..? आमचं पुन्हा पुन्हा एकच म्हणण, जर विश्वविख्यातांनी काढला, नसता आमचा बाप तर झाला नसता तुमच्या मालकांना हा एवढा ताप!”
…या प्रस्तुत प्रसंगी “जाणता राजा” हरला नाही, तर तो जिंकला…
हे सांगण्यासाठी दरबारी राजकारणात “भाट” ठेवलेले असतातच…
वेगवेगळ्या “माध्यमातून” भाट आपलं काम चोख करीत आहेत.
■ विश्वविख्यात प्रवक्ते आणि शापित दरबारी प्रभादेवीच्या गल्लीत बसून सांगतात की, हा तर दिल्लीचा डाव..?…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 6, 2023
दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा रंगली होती. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. “अजितदादा आमच्यात आल्यामुळे शिवसेनेत नाराजी नाही. उलट सरकार आणखी मजबूत झाले आहे. आम्ही नाराज असल्याच्या अफवा विरोधकांकडून केल्या जात आहेत.” यावेळी एकनाथ शिंदे यांनी तुम्ही तुमच घर बघा, तुमचं घर तुटलं आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला होता.