थकबाकीच्या वसुलीसाठी कारवाईचा पवित्रा
सातारा – सातारा पालिकेच्या स्थावर जिंदगी विभागाने मुदती संपलेल्या 318 गाळेधारक व करंजे एमआयडीसीतील 60 भूखंडधारकांना थकबाकीप्रकरणी नोटीसा बजावल्या आहेत.
या नोटीशींमुळे गाळेधारकांच्या मागे “मार्च एंड’चा तगादा सुरू झाला आहे. वसुली विभागाच्या वसुलीची टक्केवारी 28 टक्क्यांवर येऊन ठेपली असून तब्बल 30 कोटी रूपये थकबाकी आहे. हा बोजा कमी करण्यासाठी स्थावर जिंदगी विभागाने थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांना देयके तातडीने भरण्यासंदर्भात नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये पालिकेच्या मालकीच्या गाळ्यात भाडेकरू असणाऱ्या पण मुदत संपलेल्या 318 जणांसह करंजे एमआयडीसीत मुदत संपूनही भूखंड (पान 5 वर)
थकबाकीच्या वसुलीसाठी कारवाईचा पवित्रा सातारा, दि. 7 (प्रतिनिधी) -सातारा पालिकेच्या स्थावर जिंदगी विभागाने मुदती संपलेल्या 318 गाळेधारक व करंजे एमआयडीसीतील 60 भूखंडधारकांना थकबाकीप्रकरणी नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीशींमुळे गाळेधारकांच्या मागे “मार्च एंड’चा तगादा सुरू झाला आहे. वसुली विभागाच्या वसुलीची टक्केवारी 28 टक्क्यांवर येऊन ठेपली असून तब्बल 30 कोटी रूपये थकबाकी आहे.
हा बोजा कमी करण्यासाठी स्थावर जिंदगी विभागाने थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांना देयके तातडीने भरण्यासंदर्भात नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये पालिकेच्या मालकीच्या गाळ्यात भाडेकरू असणाऱ्या पण मुदत संपलेल्या 318 जणांसह करंजे एमआयडीसीत मुदत संपूनही भूखंड पालिकेच्या हवाली न करणाऱ्या 60 जणांना नोटीसा देण्याचा प्राथमिक टप्पा पार पाडण्यात आला आहे. 1 मार्च ते 31 मार्च या दरम्यान प्रत्यक्ष जप्तीच्या कारवाया करण्यात येणार आहेत.