North Korea fires artillery : उत्तर कोरियाने सर्व जग झोपले असताना आज पहाटे दक्षिण कोरियावर बॉम्ब हल्ले केले आहेत. एक दोन नाही तर तब्बल 200 राउंड बॉम्ब हल्ले करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे बॉम्ब दक्षिण कोरियाच्या हद्दीत पडले नसले तरी अजूनही या भागात भीतीचे वातावरण आहे.
Joint Chiefs of Staff briefing on North Korean provocations.
Translated Using AI#NorthKorea #SouthKorea #Korea pic.twitter.com/x4tBrl29W6
— Raw Reporting (@Raw_Reporting) January 5, 2024
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील वाद सातत्याने वाढत असून कोरियन द्वीपकल्पात युद्धाची परिस्थिती निर्माण होत आहे. दक्षिणेकडील लष्कर सातत्याने हल्ल्याचा सराव करत आहे. याबाबत, शुक्रवारी दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या सीमेजवळील येओनप्योंग बेटावरील रहिवाशांना तात्काळ स्थलांतर करण्यास सांगितले.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने या हल्ल्याची माहिती दिली आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने दक्षिणेकडील येओनप्योंग बेटावर 200 राउंड बॉम्ब हल्ले केले. यानंतर लगेचच दक्षिण कोरियाने बेटावर राहणाऱ्या २ हजार लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोरियाने या कारवाईचा निषेध केला असून याला ‘प्रक्षोभक कृती’ म्हटले आहे.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले की, उत्तर कोरियाने शुक्रवारी 200 हून अधिक बॉम्ब हल्ले केले आहेत. दोन कोरियांमधील वास्तविक सागरी सीमा नॉर्दर्न लिमिट लाइन (NLL) च्या उत्तरेला शेल पडले. मात्र, कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.