बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर 1.4 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. या प्रसंगी तिने हा क्षण शेअर करताना आपले आयुष्य बदलले असल्याचे ठाम विश्वासाने सांगितले. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती बेली डान्स करताना दिसत आहे.
नोराने पोस्ट केले की, या थ्रोबॅक व्हिडिओसह 1.4 कोटी फॉलोअर्स झाल्याचा आनंद व्यक्त करत आहे. ज्यांनी माझे आयुष्य कायमचे बदलून टाकले आहे. 2018 मध्ये बंगळुरु येथील मिस इंडिया अवॉर्डस प्रसंगी मी इंप्रोमेप्टू सोलो सादर केले होते, जे इंटरनेटवर खूप व्हायरल झाले आणि “दिलबर’ गाण्यात मला काम करण्याची संधी मिळाली.
नोरा फतेही म्हणाले, “मी माझ्या सोलो परफार्मेसची तयारी केली नव्हती. मी फक्त संगीताची अनुभूती घेत थेट परफार्मे केले. सुदैवाने “दिलबर’ व्हिडिओमध्ये मी असाच ड्रेस घातला होता. 1.4 कोटी फॉलोअर्ससाठी सर्वांचे आभार.’
दरम्यान, बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच सर्वोत्कृष्ट डान्सर म्हणून प्रसिद्धी मिळविलेल्या नोराने “मनोहरी’, “दिलबर’, “ओ साकी साकी’, “कमरिया’ आणि “गर्मी’ या सारख्या गाण्यामधून आयटम डान्स करत प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य केले आहे.