नवी दिल्ली – ठाण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती आज नोएडा येथे घडली आहे. ग्रेटर नोएडा येथे बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळल्याची ( Elevator collapses) दुर्घटना समोर आली आहे.
आम्रपाली इमारतीमध्ये लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात 4 मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गौर सिटी एक मूर्तीजवळ इमारतीचे काम सुरू होते. काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत चार मजूरांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.
दुर्घटना घडली त्यावेळी लिफ्टमध्ये बांधकामासाठीचे साहित्य आणि कामगार होते. मृत कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सर्व मृत कामगार हे बिहारच्या किशनपूरच्या टभका गावात राहणारे होते.