पुणे – आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांच्या बांधकामासाठी ६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. वितरीत करण्यात आलेला निधी योग्य रित्या खर्च होती आहे का याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२४ या वर्षाकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक याच्या कल्याणावरील उपयोजनेंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांचे बांधकाम या योजनेसाठी वित्त विभागाने मान्यता दिलेल्या निधीच्या मर्यादेत अर्थसंकल्पीय अंदाज वितरण प्रणालीवर उपलब्ध असलेला निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी निधी अर्थसंकल्पीय समाविष्ट असलेल्या कामांवरच खर्च करण्याबाबत तसेच प्रशासकीय मान्यतेच्या, सुधारित प्रशासकीय मर्यादेतच खर्च करण्याबाबत दक्षता घ्यावी. निधी दिलेल्या कामासाठीच खर्च होईल याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकारी व अधिक्षक अभियंता यांची राहणार आहे.
अधिक्षक अभियंता बांधकामांना वेळोवेळी भेटी देण्यात येवून कामाचा दर्जा, गुणवत्ता यांची तपासणी करावी लागणार आहे. वितरीत निधीमधून झालेल्या खर्चाचा अहवाल नियंत्रक अधिकारी यांनी एकत्रित करुन तो शासनास सादर करावा लागणार आहे.