Nitish Kumar – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत बिहार विधानसभेत दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ सुरु झाला आहे. नितीश यांच्या माफीनाम्यानंतरही प्रकरणाची शांत झालेले दिसत नाही. मुख्यमंत्र्यांच्या अपमानास्पद शब्दांवर बुधवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बिहार विधानसभेत निदर्शने केली. त्याचबरोबर अनेक नेते त्यांचा तीव्र शब्दात निषेधही करत आहेत. आता भाजप खासदार आणि भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी यांनीही या प्रकरणी आपले वक्तव्य केले आहे.
भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले की, ‘मुख्यमंत्री नितीश आजकाल गलिच्छ चित्रपट पाहून रात्री झोपतात, त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले. मनोज तिवारी यांनी वृत्त वाहिनीशी संवाद साधताना नितीश कुमार यांच्यावर खोचक टीका केली.
त्याचवेळी नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी महिला शिक्षणाच्या महत्त्वावरील वादग्रस्त टिप्पणी मागे घेत बुधवारी सांगितले की, ‘त्यांच्यामुळे कुणाच्या भावना दुखल्या असेल, तर मी त्याबद्दल माफी मागतो आणि खेद व्यक्त करतो.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर खटला चालवण्याची मागणी करणारी याचिका बुधवारी मुझफ्फरपूर न्यायालयात दाखल करण्यात आली. वकील अमिताभ कुमार सिंह यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी पंकज कुमार लाल यांच्या न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. पत्रकारांशी बोलताना अमिताभ कुमार सिंह म्हणाले की, “माझी याचिका स्वीकारण्यात आली असून न्यायालय या प्रकरणावर २५ नोव्हेंबरला सुनावणी करणार आहे. देशाचे पंतप्रधान होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या असभ्य वक्तव्याबाबत मी ही याचिका दाखल केली आहे.’