Nitishkumar । बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल बिहारच्या नवादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर एक हास्यास्पद वक्तव्य केलंय. एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांचं २५ मिनिटांचं भाषण आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पयादेखील पडले आहेत. त्याच्या सर्व कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येतोय.
भाजपाकडे ४००० पेक्षा जास्त खासदार असतील Nitishkumar ।
बिहारच्या नवादा येथे आज भाजपाची सभा पार पडली. या कार्यक्रमाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जवळपास २५ मिनिटे भाषण केलं. हे भाषण अत्यंत कंटाळवाणं आणि अनेक चुकीच्या शब्दांनी भरलेलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावरहीया भाषणाच्या क्लिप्स आता व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान, भाजपाकडे ४००० पेक्षा जास्त खासदार असतील, असा हास्यास्पद विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आज नीतीश जी ने तो 4000 पार का नारा लगा दिया। 🤣 pic.twitter.com/Sef6ACaSxo
— Kanchana Yadav (@Kanchanyadav000) April 7, 2024
यावेळी बोलताना नितीशकुमार यांनी,“आपण यापेक्षाही पुढे जाऊ. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊच. पुढच्या पाच वर्षांत काहीच अडचण येणार नाही. मला खात्री आहे की चार हजारपेक्षा जास्त खासदार भाजपात असतील”, असे म्हटले.
नितीश कुमारांनी केले मोदींचे चरणस्पर्श Nitishkumar ।
त्यानंतर भाषण संपल्यानंतर व्यासपीठावर नितीश कुमार हे नरेंद्र मोदींच्या शेजारीच बसले होते. या दोघांमध्ये चर्चा सुरू असताना नितीश कुमारांनी नरेंद्र मोदींचे चरणस्पर्श केले. त्यांचा हा व्हीडिओही तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान, भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४०० पारचा नारा दिला आहे. असे असतानाही मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने ४ हजारचा उल्लेख केल्याने त्यांना प्रचंड ट्रोल केलं जातंय.