Neena Gupta : अभिनेत्री नीना गुप्ता ( Neena Gupta) अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे अधिक करून ओळखल्या जातात. चित्रपटांसह वेबसिरिजमध्ये त्यांनी काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र आता पुन्हा एकदा नीनी गुप्ता त्यांच्या विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. एका कार्यक्रमामध्ये नीना गुप्ता यांनी अभिनेता गिरीश कर्नाड यांच्याबाबत भाष्य करत जुनी आठवण शेअर केली आहे.
एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी सांगितले की, “1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साथ साथ’मध्ये मी एका मुर्ख आणि विनोदी मुलीचे पात्र साकरले होते. माझं ते पात्र नकारात्मक होते. चित्रपटात साकारलेली भूमिका आणि चित्रपट आजही सर्वांच्या लक्षात आहे. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान गिरिश कर्नाड भेटले होते. त्यांनी माझा चित्रपट पाहून मला एक प्रतिक्रिया दिली होती.”
“तो चित्रपट पाहून मला प्रमुख भूमिका किंवा हिरोईनची भूमिका मिळणं बंद होईल. तुला कधीच कोणी अभिनेत्री म्हणून भूमिका देणार नाही. ज्यावेळी तुम्ही विनोदी भूमिका साकारतात तेव्हा तिथेच तुमच्या फिल्मी करियरला ब्रेक लागतो, असं मत गिरीश कर्नाड यांचं होतं. त्यांचं मत खरोखरंच योग्य होतं. त्या चित्रपटानंतर मला सर्वच तशाच भूमिका ऑफर करू लागले.”
“मला मार्गदर्शक म्हणून कोणीही नव्हते. ज्यावेळी मी एनएसडीमधून शिक्षण घेऊन बाहेर आली, त्यानंतर माझ्या मनामध्ये मुंबईत लगेचच काम मिळेल एक अशी समज होती. पण ही समज नंतर सपशेल चुकीची ठरली. हा एक व्यवसाय आहे. या व्यवसायाबद्दल मला फारशी माहिती नसल्यामुळे मी भरपूर चुका केल्या होत्या,” असं मुलाखतीमध्ये नीना गुप्ता म्हणाल्या.
नीना गुप्ता यांच्या कामाबद्दल सांगायचे तर, त्यांना ‘पंचायत’ वेबसीरीजमुळे सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. याशिवाय त्यांनी ‘लस्ट स्टोरीज 2’, ‘मसाबा मसाबा’ या सीरिजमध्ये आणि ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’, ‘बधाई हो आणि ‘उंचाई’, ‘ या सिनेमांमध्येही उत्तम भूमिका साकारली आहे.