मुंबई : राज्यात गेल्या काही दिवासांपासून आर्यण खान ड्रग्ज प्रकरणावरून मोठे राजकारण पेटल्याचे दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत.
असे असताना प्रभाकर साईल यांचा एक व्हिडिओ समोर आला आणि पुन्हा एकदा खळबळ उडाली सोबतच मलिकांनी केलेल्या अनेक खुलास्यावरून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. इंटरव्हलपर्यंत नवाब मलिकांनी सांगितले, आता इंटरव्हलनंतर मी बोलणार, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. राऊतांच्या या विधानावर भाजप नेते नितेश राणे यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत काल असे बोलले की इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक आहेत. इंटरव्हलनंतर मी बोलणार. तर त्यांना मी सांगतो की क्लायमेक्स मी करणार असे प्रत्युत्तर नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिले आहे.