शिक्रापूर – पिंपळे खालसा ता. शिरुर या शिरूर तालुक्यातील अनेक उच्च अधिकारी घडविणाऱ्या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रियांका राजेंद्र धुमाळ यांची तर उपाध्यक्षपदी कैलास यशवंत धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे. पिंपळे खालसा (ता. शिरुर) या गावाने शिक्षण क्षेत्रात आगळीवेगळी ओळख निर्माण केलेली असून सध्या पिंपळे खालसा हे अधिकाऱ्यांचे गाव अशी नवीन ओळख गावाने मिळवली आहे, या गावातील शालेय व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच करण्यात आली.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रियांका राजेंद्र धुमाळ यांची तर उपाध्यक्षपदी कैलास यशवंत धुमाळ, काजल शिंदे सुरेखा धुमाळ, आशा धुमाळ, नीलम झेंडे, विशाल पलांडे, रूपाली धुमाळ, संजय कदम, विकास धुमाळ, गणेश दौंडकर, बाळासाहेब नवगिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर निवडीनंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला याप्रसंगी सरपंच सुप्रिया धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य बापू गावडे, ग्रामपंचायत सदस्य रागिनी धुमाळ, मुख्याध्यापक ललिता लंघे, माजी सरपंच समीर धुमाळ, संदीप सुरसे, माजी उपसरपंच कैलास धुमाळ, संपत धुमाळ, दत्तात्रय धुमाळ, महेश धुमाळ, मकरंद धुमाळ, सतीश धुमाळ, राजेंद्र धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य अच्युत धुमाळ, चंद्रकांत धुमाळ, यांसह आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते, तर निवडीनंतर बोलताना शाळेचे कामकाज अजूनही वेगाने करून शाळेची आगळीवेगळी ओळख देशभरात पोहचेल अशा पद्धतीने काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सांगितले.