मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत बहुमत चाचणी पास केली. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि काही अपक्षांच्या जोरावर उद्धव ठाकरे सरकारने 169 आमदारांच्या मदतीने बहुमत सिद्ध केले. भाजपाने यावेळी सभात्याग केला तर एकूण 4 आमदार तटस्थ राहिले. हंगामी अध्यक्ष बदलल्यामुळे आणि नियमबाह्य अधिवेशन बोलवल्यामुळे भाजपा आमदारांनी पहिले सभागृहात आणि नंतर सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली. यानंतर आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे.
??? pic.twitter.com/Gp1XHl5tYO
— nitesh rane (@NiteshNRane) November 30, 2019
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर, एका गाडीला माकडांनी वेढा घातल्याचा फोटो टाकला आहे. या फोटोत काही माकडं गाडीचा दरवाजा उघडून चालकाच्या जागी, काही गाडीच्या वर बसलेली दिसतात. याचसोबत या फोटोवर, लेकिन एक को भी चलाना नही आता ! अशी कॅप्शन लिहीलेली आहे.