नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे दावे समोर आले होते. त्यातच आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यातआले असून भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सुरुवातीपासून टीका केली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा आणि आदित्य ठाकरे यांचा काही संबंध आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
अशात आता पुन्हा नितेश राणे यांनी पुन्हा एकदा या घटनांचा संदर्भ घेत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. लवकरच मोठा गौप्यस्फोट करावा लागेल असा इशारा दिला आहे. जेलच्या भितीने एकनाथ शिंदे भाजपासोबत गेले या शिवसेनेच्या (ठाकरे गट) टीकेला नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.
नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की,’जेल च्या भितीने शिंदे साहेब भाजप बरोबर गेले.. मग penguin आणि UT ने Disha salain च्या केस च्या भितीने कोणा कोणाचे हात पाय पकडले.. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले हा पण गौप्यस्फोट करायला लागेल लवकरच !!! ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है” असं म्हणत राणे यांनी लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे सूचक ट्विट केले आहे.
नितेश राणे यांचे ट्विट
जेल च्या भितीने शिंदे साहेब भा ज प बरोबर गेले..
मग penguin आणि UT ने Disha salain च्या केस च्या भितीने कोणा कोणाचे हात पाय पकडले.. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले हा पण गौप्यस्फोट करायला लागेल लवकरच !!!
‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है’
— nitesh rane (@NiteshNRane) April 12, 2023