#corona : गरीबांसाठी तब्बल 1लाख 70 कोटींचे पॅकेज

वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यासाठी 50 लाखाचा विमा; हा घ्या सर्व तपशील

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज ग्रामीण आणि शहरी भागातील गरीबांसाठी जाहीर केले. ही मदत त्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करण्यात येईल. त्याच बरोबर देशभर पसरत असलेल्या कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 50 लाखांचा विमा उतरवण्याची घोषणाही त्यांनी केली.

या योजनेचा लाभ कोट्यवधी गरीबांना होईल. तर विमा योजनेचा लाभ आरोग्य क्षेत्राय कार्यरत डॉक्‍टर्स, नर्स आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना होईल. त्याची संख्या सुमारे 20 लाख असेल.

सीतारामन यांनी जाहीर केलेल्या योजना

1) 80 कोटी गरीबांसाठी पुढील तीन महिने एक किलो डाळ आणि पाच किलो गहु/तांदूळ

2) मनरेगाच्या मजुरीत 182 रुपयांवरून 202 रुपयांपर्यंत वाढ

3) ज्येष्ठ नागरिक, गरीब विधवा, गरीब आणि वृध्द दिव्यांग यांना पुढील तीन महिन्यात दोन हप्त्यात एक हजार रुपयांचे विशेष सानुग्रह अनुदान

4) स्वयंसहायता गटास एकत्रित मोफत 20 लाखांचे कर्ज

5) कर्मचारी आणि संस्थेद्वारा भरला जाणारा भविष्य निर्वाह निधी पुढील तीन महिने सरकारद्वारा भरला जाणार; 100 पेक्षा कर्मचारी असणाऱ्या आणि 90 टक्के कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपयांपेक्षा पगार कमी असणाऱ्या सर्व संस्थांना हा लाभ

6) आठ कोटी 30 लाख दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिकाधारक आणि उज्ज्वला योजनेच्या लाभधारकांना पुढील तीन महिने मोफत गॅस सिलिंडर

7) आर्थिक वर्ष 2018-19 चा आयकर परतावा भरण्याच्या मुदतीात 30 जूनपर्यंत वाढ; विलंबाने दाखल केल्या जाणाऱ्या परताव्यांवर 12 टक्‍क्‍यांऐवजी 9 टक्के व्याज

8) पॅन आधार लिंकिंगच्या मुदतीत 30 जूनपर्यंत वाढ

9) बचत खात्यात किमान रक्कम ठेवण्याची अट रद्द, कोणत्याही मोबदल्याविना कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येणार

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.