मुंबई – अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधल्याने तिच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. अनेकांनी कंगनाच्या वक्तव्याची तीव्र शब्दांमध्ये निंदा केली असून तिला खडे बोल सुनावले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत रंगलेल्या ट्विटर वॉर दरम्यान कंगनाने मुंबईबाबतचे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत.
‘हारामखोर‘ म्हणजे ‘नाॅटी’.. मग ‘संज्या’ म्हणजे ‘लंगोटी‘ ???.. संज्याने परत माती खाल्ली. कंपाऊंडरची औषधे खाऊन खाऊन संज्या ही अवस्था झाली आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 8, 2020
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी त्यांनी कंगनाला उद्देशून वापरलेल्या ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ उलगडून सांगितला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी, ‘हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान, ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं’ अशी भूमिका मांडली.
संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना हरामखोर असा शब्द वापल्याने वाद अधिकच चिघळला होता. याच युक्तिवादावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले निलेश राणे
‘हरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी? अशी विचारणा निलेश राणे यांनी केली आहे. तसेच कम्पाऊंडरची औषधे खाऊन खाऊन संजय राऊतांची अशी अवस्था झाली आहे, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.’