निलेश राणेंची बोचरी टीका, म्हणाले अजित पवार…

मंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत धक्कादायक विधान केल्यानंतर भाजप- राष्ट्रवादीमध्ये चांगले शितयुध्द चालू झाले आहे. यामध्ये निलेश राणे यांनी उडी घेत अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

निलेश राणे टीका करताना म्हणाले की, चंद्रकांतदादा अजित पवारांवर बोलल्यावर नेमकेच राष्ट्रवादीवाले विस्कटले. अजित पवार मोठा नेता नाही, त्यांना मोठा नेता मानन्याचं कारण देखील नाही, त्यांना राजकारणात जी संधी मिळाली ती फक्त पवार साहेबांमुळे पण त्यांनी घाण केली, त्यांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला काडीचा फायदा झाला नाही. अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर राजकीय वादाला सुरुवात झाली होती. यामध्ये आता निलेश राणे यांची उडी घेतली त्यांनी अजित पवार यांना लक्ष केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.